कालची जखम
कालची जखम वेगळीच होतीअसे कसे म्हणू मित्रा
वेदनांची आवर्तने सारी एकाच जातीची
कबूल! आजचा वार निसटता आहे
भळभळून रक्त वाहत नाही कालसारखे
कालची जखम वेगळीच होतीअसे कसे म्हणू मित्रा
वेदनांची आवर्तने सारी एकाच जातीची
कबूल! आजचा वार निसटता आहे
भळभळून रक्त वाहत नाही कालसारखे
पण, आजच्या ह्या निसटत्या वारानेच
कालची जख्म जर्द झाली त्याचे काय?
-डब्ल्यू कपूर
000
वाटेनेच आपला धर्म बदलला
कालची जख्म जर्द झाली त्याचे काय?
-डब्ल्यू कपूर
000
वाटेनेच आपला धर्म बदलला
हे मात्र पहिल्यांदाच अनुभवतो आहे
नाही असे नाही
तसे चिमटे ह्या आधीही काढले होते
खरे सांगतो,
पायांना ते कधी झोंबलेच नाहीत
आज असे कसे होत आहे ?
चक्क चटके बसताहेत निखारयांचे
माझ्या आधीही कित्येक गेलेत ना ह्या वाटेने
मग मलाच कां ही जीवघेणी सजा ?
माझे पायच झालेत अधिक संवेदनशील
की वाटेनेच आपला धर्म बदलला ?
-डब्ल्यू. कपूर
सुन्दर कविता और ब्लॉग बधाई
ReplyDelete